वीट भट्टी कामगारांसाठी विधी साक्षरता शिबिर
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव व इंटरनॅशनल जस्टीस मिशन( IJM) यांच्यावतीने असंघटित क्षेत्रातील वीट भट्टी कामगारांसाठी विधी साक्षरता शिबिर व शासकीय योजनांची माहिती, कार्यक्रमांमध्ये प्रशांत मते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर धाराशिव वसंत.श्री.यादव यांच्या मार्गदर्शनाखाली असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी विधी साक्षरता शिबिर कार्यक्रम धाराशिव तालुक्यातील वडगाव सिद्धेश्वर येथे घेण्यात आला. यावेळी उपस्थितांना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी कायदेशीर सेवा योजना, 2015 विशेष सेलचे सदस्य प्रशांत मते यांनी वीट भट्टी कामगारांसाठी शासकीय योजनाची माहिती दिली. विधी सेवा प्राधिकरण कायदेविषयक माहिती पॉम्पलेट महिला व पुरुष ,वृद्ध यांना वाटप करून, मोफत कायदेविषयक सेवा याविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी असंघटित क्षेत्रातील कामगार , वीट भट्टी कामगार उपस्थित होते
0 टिप्पण्या