Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने स्वच्छता अभियान..विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.. गणेश वाघमारे यांचे आवाहन.

फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने स्वच्छता अभियान..
विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.. गणेश वाघमारे यांचे आवाहन.

प्रतिनिधी...मनोज जाधव 9823751412

धाराशिव :- फुले शाहु आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था धाराशिव संचलित फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने युगप्रवर्तक विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असुन आज रोजी नगर परिषदेच्या माध्यमातुन फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित मोकळ्या जागेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले,गतवर्षी प्रमाणे याही वर्षी समितीच्या वतीने आकर्षक अशा देखाव्याचे सादरीकरण करण्यात आले असुन त्याचे काम चालु आहे,दि.११ एप्रिल रोजी या देखाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असुन या दिवशी शासकीय योजनांचा मेळावा, महामानवांच्या जीवन कार्यावरील चित्र प्रदर्शन भरविण्यात येणार आहे,दि.१२ एप्रिल रोजी आरोग्य शिबीर,दि.१३ एप्रिल रोजी गुणवंतांचा सत्कार,दि‌.१४ एप्रिल रोजी युगप्रवर्तक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम,भोजनदान सकाळी ११ ते रात्री १२ पर्यंत ठेवण्यात आले आहे,या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन गणेश वाघमारे यांनी केले आहे.स्वच्छता अभियानात फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीचे गणेश वाघमारे,बलभीम कांबळे, संजय गजधने,संपतराव शिंदे,स्वराज जानराव,अतुल लष्करे,पप्पु सरवदे,नगर परिषद स्वच्छता विभाग अधिकारी गणेश महेर,सागर प्रधान,राजेंद्र पेठे,सफाई कर्मचारी महिला भगिनी व बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या