बचत गटाच्या उत्पादनांची विक्री थेट स्वस्त धान्य दुकानातून....
मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412
जिल्हाधिकारी कीर्ती कुमार एच पुजार यांच्या हस्ते उद्घाटन
जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव उमेद व नागरी उपजीविका अभियान यांचे संकल्पनेतून महिला बचत गट उत्पादने स्वस्त धान्य दुकानाचे दारीं हा नावीन्य पूर्ण उपक्रमाचे मा. जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली व त्यांचे हस्ते दिनांक 9/4/2025 रोजी धाराशिव येथे उदघाटन करण्यात आले. सदर उदघाटन प्रसंगी मा. मैनाक घोष मुख्य कार्यकारी अधिकारी zp, जाधव addl ceo धाराशिव, स्वाती शेंडे जिल्हा पूरवठा अधिकारी, श्री अजित डोके जिल्हासह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग इतर अधिकारी आणि उमेद NULM च्या महिला बचत गटातील महिला हजार होत्या.
जिल्ह्याचा आर्थिक विकास होण्याच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय...
सदर नावीन्य पूर्ण उपक्रमाचा मुख्य उद्देश हा जिल्ह्यातील महिला बचत गटाना अधिक सक्षम करणे हा असून यातून महिला बचत गटांच्या स्थानिक उत्पादनाना नक्कीच मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळू शकतो.
प्रायोगिक तत्त्वावर या दुकानातून विक्री सुरू...
आज उदघाटन प्रसंगी धाराशिव जिल्ह्यातील तीन रास्त भाव दुकानें नाव श्री नागेश जगदाळे दु क्र 17श्री प्रदीप गणेश दु क्र 21 बाजार चौक आणि मुदसिरोडीन काजी दु क्र 9 गणेश नगर येथे प्रायोगिक तत्वा वर चालू करण्यात आली असून स्वतः मा जिल्हाधिकारी आणि मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी महिला बचत गट उत्पादने खरेदी करून महिला बचत गटातील महिलांशी त्यांचे वस्तू उत्पादने अडचणी यावर चर्चा केली. तसेच रास्त भाव दुकानदारांना सदरील उपक्रमास महिला बचत गटांना पूर्ण सहकार्य करावे तसेच रास्त भाव दुकानाशी संबंधित विष्यावर चर्चा करून ekyc बाबतीत देखील सूचना दिल्या.
0 टिप्पण्या