फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने महामानवांच्या जयंती महाउत्सवास सुरुवात..
मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412
धाराशिव :- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने उद्या दि.11 एप्रिल रोजी सकाळी अभिवादन कार्यक्रम तसेच शासकीय योजनांचा मेळावा व आकर्षक अशा देखाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे, हा जयंती महोत्सव पाच दिवस आहे.शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहचावी या उद्देशाने या जयंती महोत्सवात शासकीय माहिती योजनेचा मेळावा घेण्यात आला आहे तरी सर्व नागरिकांनी या शासकीय योजनेच्या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या