📰 शिवसेना महिला सेनेला नवा उत्साह!
मीनाताई सोमाजी कदम यांची जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
प्रतिनिधी...मनोज जाधव 9823751412
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, तसेच पक्ष सचिव संजय पुष्पलता मोरे यांच्या स्वाक्षरीने धाराशिव जिल्ह्यातील उमरगा-लोहारा व तुळजापूर विधानसभा क्षेत्रासाठी श्रीमती मीनाताई रामचंद्र सोमाजी कदम यांची महिला सेना जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे महिला सेनेच्या कार्यात नवसंजीवनी येणार असून, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मीनाताई कदम यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा प्रमुख मोहन पणुरे, तालुकाप्रमुख अमोल जाधव, शहर संघटक प्रशांत (नितीन) मस्के, उपशहरप्रमुख रमेश (काका) चिवचवे, शहाजी हाके, स्वप्निल सुरवसे, अंकुश रुपनर, गणेश पाटील, संजय लोंढे, तसेच महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मीनाताई कदम यांनी आपल्या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की,
“महिला सेनेच्या माध्यमातून महिला वर्गाच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे लढा देत, पक्षविस्तारासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यात महिला सेना एक ताकदवान संघटना म्हणून उभी राहील.”
या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील महिला शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, महिला सेनेला नवचैतन्य प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे.


0 टिप्पण्या