Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

भाई फुलचंद गायकवाड पाटील यांची रिपब्लिकन सेना धाराशिव जिल्हा महासचिवपदी निवड!


     

           प्रतिनिधी...मनोज जाधव 


धाराशिव प्रतिनिधी-आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत, कार्यतत्पर आणि समाजकारणात सक्रिय असलेले आयु.भाई फुलचंद अंबादास गायकवाड पाटील (सिद्धार्थ नगर,धाराशिव,ता. जि.धाराशिव) यांची रिपब्लिकन सेना, धाराशिव जिल्हा महासचिव म्हणून निवड करण्यात आली आहे.

ही नियुक्ती सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनाच्या आदेशानुसार, धाराशिव जिल्हा प्रभारी आयु. कपिल सरोदे साहेब आणि जिल्हाप्रमुख अनिल हजारे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक.05/1025 रो झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत एकमताने करण्यात निवड आली.




या नियुक्तीनंतर आयु. गायकवाड पाटील यांनी सांगितले की,

> “मी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचे विचार, तत्त्वे आणि चळवळ धाराशिव जिल्ह्याच्या प्रत्येक गावात पोहोचवण्याचा दृढ निश्चय केला आहे. रिपब्लिकन सेनेची संघटना अधिक जोमाने उभी करण्यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांसह सातत्याने प्रयत्न करत राहीन.”

या नियुक्तीबद्दल सर्व आंबेडकरी बांधव, रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आयु. भाई फुलचंद गायकवाड पाटील यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या