प्रतिनिधी...मनोज जाधव 9823751412
धाराशिव :- कमलाकर ऊर्फ बिल्ला बनसोडे मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विविध उपक्रम राबवुन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन बुध्द वंदना घेण्यात आली,शासकीय महिला रुग्णालयात साडी व अन्नदान करण्यात आले,टि शर्टचे वाटप करण्यात आले.यावेळी शासकीय महिला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षका डॉ स्मिताताई गवळी, डॉ.रामढवे,हरी बापु भिंगडे देवळालीकर,शशी माने,दिपक गायकवाड, राहुल गायकवाड सह कमलाकर ऊर्फ बिल्ला बनसोडे मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.कमलाकर बनसोडे यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या