प्रतिनिधी....मनोज जाधव
धाराशिव – महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद, धाराशिव कृषी विभागाच्या वतीने ‘कृषी दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात धाराशिव तालुक्यातील मेडशिंगा येथील दत्ता काका रणदिवे यांना त्यांच्या शेती व शेतीपूरक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
दत्ता काका रणदिवे यांनी धाराशिव तालुक्यात आधुनिक व तंत्रज्ञानाधिष्ठित शेती पद्धतीचा अवलंब करून कृषी क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यामुळे अन्य शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत असून त्यांची कार्यपद्धती आदर्श ठरत आहे. कृषी दिनाच्या निमित्ताने अशा उल्लेखनीय शेतकऱ्यांचा गौरव केल्याने शेती व्यवसायाला अधिक बळ मिळणार आहे.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण एच पुजार तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी सन्मानपत्र प्रदान केले. कार्यक्रमाचा हा गौरवाचा क्षण दत्ता रणदिवे यांच्या कार्याचा राज्यस्तरावर गौरव करणारा ठरला.
या कार्यक्रमास जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी श्री रवींद्र माने तसेच तालुका कृषी अधिकारी एस पी जाधव तसेच मेडशिंगा गावचे कृषी सहाय्यक आनंद जाधव व सुपरवायझर पुष्पराज तीर्थकर तसेच कृषी सहाय्यक लेणेकर तसेच आबा हिप्परकर,गणेश मगर, संतोष माळी, जोशी साहेब, नितीन पाटील, ढवळशंक साहेब तसेच किरण आगळे रमन आगळे यांच्यासह कृषी विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते यावेळी दत्ता रणदिवे यांच्यासोबत मेडशिंगा येथील भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष काकासाहेब शेलार, बालाजी देशमुख, बबन देशमुख, महेश लांडगे,
0 टिप्पण्या