Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

कर्म हीच पूजा समजून. श्रम करण्यात आनंद माना- शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे

 

    प्रतिनिधी....मनोज जाधव 

  रुईभर :-दि १ जुलै रोजी श्रम करण्यात आनंद मानला पाहिजे .  कोणत्याही कामाला कमी न समजता काम करण्यात आनंद दाखवला तर ते काम चांगले होते. आपण काम करून घेत असताना समोरील व्यक्तींना समजून घेऊन काम करणे आवश्यक असते. आपण आनंदी राहून दुसऱ्याला आनंदी पाहिले. आनंद द्या व आनंद घ्या या उक्ती प्रमाणे आपला व्यवहार असला पाहिजे.  आपले व्यक्तिमत्व असे असले पाहिजे की समोरील व्यक्ती आनंदाने काम स्वीकारून काम करेल सर्वांच्या सहकार्यानेच विकास साधता येतो. एकमेकांच्या मदतीनेच कोणत्याही संकटाचा सामना करता येतो. प्रमुख व्यक्तींनी आनंदित ठेवून काम करून घ्यावे. सर्वात प्रथम आपले काम पूर्ण करून दुसऱ्याच्या कामाची गणना करावी. कसलाही प्रकारचे दडपण न येऊ देता काम करून घ्यावे. आनंदी काम करताना श्रमामुळे थकवा न येता आवडीने काम करत असतो. उत्तम काम व आनंद जीवन जगण्यातच खरी सार्थकता असते. म्हणून श्रम करण्यात व करून घेताना कसलेही दडपण न देता आनंद मानावा असे प्रतिपादन जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथील नूतन मुख्याध्यापक कार्यालयाचे उद्घाटन करताना डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे बोलत होते.

      नवीन मुख्याध्यापक कार्यालयाचे उद्घाटन शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे यांच्या हस्ते करण्यात आले. 

     याप्रसंगी माजी जि प सदस्य श्री रामदास अण्णा कोळगे, माजी ग्राप सदस्य श्री राजनारायण कोळगे,  श्री स्वामी समर्थ कला विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुअ नानासाहेब शेलार, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.   

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कांबळे यांनी तर आभार काकासाहेब डोंगरे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या