प्रतिनिधी....मनोज जाधव
रुईभर : -दि 14 जुलै रोजी जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे वर्गातील वर्ग प्रमुखांची लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन निवड करण्यात आली. सर्व वर्ग प्रमुखांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांच्या या निर्णयाने विद्यालयात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
वर्ग प्रमुखांनी आपल्या वर्गातील प्रशासन त्यांनी स्वतः चालवण्याची जबाबदारी त्यांच्यामार्फत केली जाणार आहे. हा अनोखा उपक्रम सुरू केल्यामुळे विद्यालयातील वातावरण प्रसन्न झाले आहे. विद्यालयातील सर्व कामकाज वर्ग प्रमुखाच्या माध्यमातून चालू झाल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनीही त्यांची नेमणूक स्वीकारून खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चालू आहे.
या सर्व प्रक्रियेला डॉ आंबेडकर बाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे, माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके , श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.
0 टिप्पण्या