अष्टपैलू व्यक्तिमत्व तानाजी महाराज भोईटे....
प्रतिनिधी...मनोज जाधव...
आई वडिलांचे संस्कार ठरले मार्गदर्शक...
तानाजी महाराज भोईटे यांचे आई वडील हे वारकरी संप्रदायातील असून त्यांनी आपल्या मुलाला पण लहान पणापासूनच वारकरी संप्रदायाची शिकवण आणि शिदोरी दिली ती त्यांना आयुष्यभर कामी आली ..
वनविभाच्या अंतर्गत कामकाज करताना उल्लेखनीय कामगिरी केली....
सामाजिक वनीकरण विभागात काम करत असताना घन वनाच्या माध्यमातून लाखो वृक्षांची लागवड आणि संवर्धन तर केलेच परंतु उन्हाळ्याच्या दिवसात मुक्या प्राण्यांना पाण्याची सोय करण्यासाठी त्यांनी हजारो पाणवठे तयार करून संताची शिकवण आपल्या आचरणात आणली...
मराठा आरक्षणाच्या चळवळीत मोठे योगदान...
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जो लढा उभा केला त्या आंदोलनाची पताका आपल्या खांद्यावर घेऊन त्यांनी गावोगावी जाऊन जनजागृती करण्याचे काम अतिशय उत्तम केले...
सर्व मुले उच्चशिक्षित...
समाजात काम करत असताना व जीवन जगत असताना शिक्षण हे खूप महत्त्वाचे आहे हे मान्य करून त्यांनी आपल्या तीनही मुलांना उच्चशिक्षित तर केलेच परंतु त्यांना स्वतःच्या पायावर देखील उभं केलं...
कीर्तनातून समाजप्रबोधन...
आपल्या कीर्तन सेवेच्या माध्यमातून विनामुल्य कीर्तन सेवा देताना तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहून आपले जीवन कसे जगता येईल याचा संदेश आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून देतात...
कलियुगातील कर्ण...
तानाजी महाराज भोईटे यांना कलियुगातील कर्ण म्हणून जरी संबोधले तरी वावगे ठरणार नाही कारण त्यांनी रिटायरमेंट होताना एक संकल्प केला की आपल्या लहान भावाला कर्ज वाटून देणार नाही आणि माझ्या फंडातील जमा झालेल्या रक्केतील निम्मी रक्कम लहान भावाला देणार...
असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आज 32 वर्ष सामाजिक वनीकरण विभागात काम करून वयोमान सेवा निवृत्त झालं....
त्यांच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिक्षण सम्राट श्री सुभाषराव विश्वनाथराव कोळगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय वन अधिकारी श्री करे हे होते तर प्रमुख उपस्थित म्हणून बेडके,रेंज फॉरेस्ट ऑफिसर श्री पचरंडे तसेच, गांधले,मुधोळे,माने,कावळे,गव्हार,घुटे,चव्हाण,श्रीकांत पवार, यांच्यासह गावातील हजारो लोक उपस्थित होते..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता बारगुळे यांनी केले तर आभार डॉक्टर संभाजी धुमाळ यांनी मानले.....
0 टिप्पण्या