Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

तगर भुमी वर्षावास महोत्सवाचे प्रसिध्द पत्रक प्रकाशन,धम्मदेसनाचा लाभ घ्यावा.. पुज्य भंते सुमेध नागसेन यांचे आवाहन..


     प्रतिनिधी...मनोज जाधव 

धाराशिव :- बौद्ध धम्मात वर्षावासाला अनन्य असे महत्त्व आहे,घाटंग्री गडदेवदरी परिसरात तगर भुमी जेतवन बुध्द विहाराची निर्मिती होत आहे,दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वर्षावास महोत्सव साजरा केला जात असुन या महोत्सवात धम्मदेसनाचा कार्यक्रम दि.१३ जुलै रविवारी रोजी आयोजित केला असुन प्रसिद्ध पत्रकाचे प्रकाशन पुज्य भंते सुमेध नागसेन यांचे हस्ते राजगीर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या कार्यालयात करण्यात आले,या महोत्सवात पुज्य भिक्खू दयानंद थेरो,भिक्खु धम्मशील हेरो भिक्खू पर्यावंस, तर प्रमुख धम्मदेसना पूज्यनीय भिक्खू डॉ.उपगुप्त महाथेरो यांची धम्मदेसना राहणार आहे.या महोत्सवात आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.यावेळी भंते सुमेध नागसेन,धनंजय वाघमारे,बलभीम कांबळे,बापु कुचेकर, गणेश वाघमारे,संपतराव शिंदे,नवनाथ वाघमारे, दिलीप वाघमारे,श्री धावारे सह इतर उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या