प्रतिनिधी....मनोज जाधव
धाराशिव (प्रतिनिधी) - जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवदासजी कांबळे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शनिवार, दिनांक ५ जुलै २०२५ रोजी भव्य अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी ११:३० वाजता स्वयंवर मंगल कार्यालय, राष्ट्रमाता जिजाऊ चौक, बार्शी नाका, धाराशिव येथे पार पडला आहे.
या सोहळ्याचे अध्यक्षस्थान मा. श्री. मधुकररावजी चव्हाण (मंत्री, महाराष्ट्र राज्य) हे होते तर कार्यक्रमाला शुभेच्छुक म्हणून मा. आ. श्री. राणाजगजितसिंहजी पाटील (उपाध्यक्ष, मित्रा – महाराष्ट्र राज्य) उपस्थित होते ...
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. बसवराजजी पाटील (मंत्री, महाराष्ट्र राज्य) आणि मा. श्री. अरविंदजी गोरे (चेअरमन, डॉ. बा.आ.सहकारी साखर कारखाना, ) यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली
या वेळी मेडसिंगा येथील भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष काकासाहेब शेलार तसेच त्यांच्या सोबत गावातील आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी दत्ता रणदिवे, रमन आगळे,महेश लांडगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते....
0 टिप्पण्या