रुईभर :-दि 18 जुलै रोजी - जीवनातील ध्येय प्राप्तीसाठी वाचन, अभ्यास व दृढीकरण (सिंहावलोकन ) महत्त्वाचे आहे. आपण वाचन करताना समजून घेणे, जास्तीत जास्त वेळ अभ्यास करणे आवश्यक आहे. वाचनातून आकलन किती झाले हे पाहण्यासाठी दृढीकरण (सिंहावलोकन ) आवश्यक असते. आकलन करून आपल्यात निर्णय क्षमतेचा विकास झाला पाहिजे. सर्वात शेवटी मूल्यमापन होते. मूल्यमापनापर्यंत पोहोचण्यासाठी जीवनातील महत्त्वाच्या पायऱ्यावर वाचन, अभ्यास व त्याचे दृढीकरनाला महत्त्व देणे आवश्यक असते असे प्रतिपादन जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान महाराष्ट्र शासन आरोग्य सेवेमार्फत कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी श्रीमती दैवशाला हाके, विस्ताराधिकारी, (गटशिक्षण कार्यालय, धाराशिव ) बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर स्पर्धा परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणे आवश्यक आहे. स्पर्धेत टिकायचे असेल तर टीव्ही, मोबाईल पासून थोडे दूर राहिले राहणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेसाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेची माहिती असावी. शाळा आपल्या गुणवत्तेसाठी हमेशा प्रयत्नशील असते त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. विद्यालयातील परिपाठातील प्रार्थना मंत्रमुग्ध करणारी आहे मात्र या प्रार्थनेचा अर्थ समजून घेऊन गुरुचा आदर करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. या प्रार्थनेतून जीवनात सत्यता उतरवणे आवश्यक आहे. जीवनात ध्येय ठेवून वाटचाल करावी अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली.
अवैद्यकीय पर्यवेक्षक श्री यु आर शिंदे यांनी स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर समाज जागृतीचे अनमोल कार्य करावे. कुष्ठरोग निर्मूलनासाठी आपल्या जवळील व्यक्तींना कुष्ठ रोगाची लक्षणे व उपाय यांची माहिती अवश्य द्यावी. अंगावर फिकट पांढरा, तांबूस रंगाचा, न खाजणारा, लालसर चट्टा, चट्ट्यावरील केस विरळ होणे, हातापायाला मुंग्या येणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, कानाच्या पाळीवर गाठी येणे, चेहरा तेलकट, भुवईचे केस विरळ होणे, हातापायास बधिरपणा येणे किंवा अचानक जखमा होणे ही कुष्ठरोगाची लक्षणे असू शकतात. मात्र त्यावरील निदान व नियमित बहुविध औषधोपचाराने कुष्ठरोग पूर्णतः बरा होऊ शकतो. प्रत्येकानी वैयक्तिक स्वच्छतेवर लक्ष दिले पाहिजे. सखोल माहिती कुष्ठरोगासंबंधी विद्यार्थ्यांना याप्रसंगी दिली.
विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी वैद्यकीय कर्मचाऱ्याकडून करण्यात आली.
याप्रसंगी डॉ आंबेडकर बाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे, माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके , श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा गणेश शेटे तर आभार पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे यांनी केले.
0 टिप्पण्या