प्रतिनिधी....मनोज जाधव
तुळजापूर : मानवतेचे खरे सौंदर्य हे केवळ मोठ्या भाषणांमध्ये नसून, ते आपल्या कृतीतून दिसून येते. याचाच प्रत्यय तुळजापूर तालुका शिवसेना अध्यक्ष अमोल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आला. आपल्या खास दिवसाचा उत्सव केवळ आपल्या जवळच्यांसोबत न साजरा करता, त्यांनी तो तुळजापूर शहरातील अनाथ आश्रमातील अनाथ व वंचित घटकातील मुलांसोबत साजरा केला.
अनाथ आश्रमात आल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकत होता. त्यांच्या डोळ्यांत चमक होती आणि काहींच्या डोळ्यात आनंदाश्रूही दाटून आले होते. वाढदिवसाच्या दिवशी या विद्यार्थ्यांसाठी पाच पक्वान्नांच्या जेवणाचे खास नियोजन करण्यात आले होते. गोड पदार्थ,पनीर मसाला,पापड,भज्जी,भाजी,चपाती,भात आणि इतर स्वादिष्ट पदार्थांचा सुगंध संपूर्ण आश्रमभर पसरला होता.
अमोल जाधव यांनी केक कापून मुलांबरोबर हसत-खेळत जेवण केले. यावेळी त्यांनी सांगितले की, “अनाथ व वंचित मुलं ही आपल्याच घरातील सदस्य आहेत. त्यांच्यासोबत आनंद साजरा केल्याने मनाला खरी समाधानाची जाणीव होते. दरवर्षी असा उपक्रम राबवून त्यांच्यासोबतच माझा वाढदिवस साजरा करण्याचा माझा निर्धार आहे.”
या उपक्रमाची माहिती पसरताच संपूर्ण तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव झाला. अनेकांनी सामाजिक माध्यमांवर आणि प्रत्यक्ष भेटीत अमोल जाधव यांच्या या कार्याचे मनापासून अभिनंदन केले. काहींनी तर याला “आधुनिक समाजाला दिलेला एक मौल्यवान संदेश” असे संबोधले.
खऱ्या अर्थाने, हा वाढदिवस केवळ अमोल जाधव यांचा नव्हता, तर तो त्या सर्व मुलांचा आनंदाचा उत्सव ठरला. मानवतेचा स्पर्श आणि नात्यांची ऊब हीच खरी भेट असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
0 टिप्पण्या