Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

शेतकरी हक्क परिषदेत धाराशिवचे आमदार कैलास (दादा) पाटील यांचा सहभाग– जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांची माहिती


      प्रतिनिधी...मनोज जाधव 


पुणे, दि. ४ ऑगस्ट २०२५

राज्यातील शेतकरी प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यासाठी शेतकरी हक्क परिषद २०२५ चे आयोजन ८ ऑगस्ट २०२५, शुक्रवार रोजी सकाळी १०.३० वाजता, पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे करण्यात आले आहे.

या परिषदेमध्ये राज्यातील विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक आणि राजकीय नेते सहभागी होणार असून, धाराशिवचे आमदार मा. कैलास (दादा) पाटील हे देखील यामध्ये मान्यवर पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत, अशी माहिती शेतकरी हक्क परिषदेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी दिली.

परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हक्क, शाश्वत शेती, कर्जमाफी, हमीभाव, सिंचन सुविधा, आणि शेतीविषयक धोरणांवर सखोल मंथन करण्यात येणार आहे. राज्यभरातील शेतकरी प्रतिनिधींच्या सहभागामुळे ही परिषद अधिक प्रभावी ठरणार असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

या परिषदेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रमुख मान्यवरांमध्ये पुढील मान्यवरांचा समावेश आहे:

मा. राजू शेट्टी – अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

मा. बच्चू कडू – अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष

डॉ. अजित नवले – राज्य सचिव, अखिल भारतीय किसान सभा

मा. कैलास (दादा) पाटील – आमदार, धाराशिव

डॉ. बाबासाहेब देशमुख – अध्यक्ष, शेतकरी संघटना समन्वय समिती

श्री. अनिल घनवट – माजी अध्यक्ष, शेतकरी संघटना – शरद जोशी विचार

श्री. संजय राठोड – शेतकरी नेते, विदर्भ

श्री. विलासराव पवार – अध्यक्ष, शेतकरी संघटना परिषद

श्री. प्रशांत डिक्कर – शेतकरी नेते, विदर्भ

श्री. अजित पाटील – अध्यक्ष, युवा शेतकरी संघटना, पंढरपूर

श्री. वेदप्रकाश शिरसाट – सचिव, शेतकरी हक्क परिषद

राज्यभरातील शेतकरी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि शेतीप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी होणाऱ्या या मंथनात सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या