Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

परिश्रम हेच जीवनाचे सार आहे - माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे


 

    प्रतिनिधी...मनोज जाधव 


      रुईभर :- दि 3 ऑक्टोबर - रोजी -    स्पर्धेच्या युगात आपण स्पर्धेत टिकणे आवश्यक आहे. प्रत्येकांना टिकावयाचे असेल तर आपला बहुमूल्य वेळ अभ्यासाला द्यावा लागेल. तरच यशाची वाटचाल आपण पूर्ण करू शकतो. जीवनामध्ये चढ-उतार भरपूर येतात मात्र यास न घाबरता आपण ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी हमेशा प्रयत्नशील असले पाहिजे. गरीबी ही आपल्या उन्नतीला आड येऊ शकत नाही याची जाण ठेवून शिक्षण घेतले पाहिजे. आपले आई-वडील शेतकरी आहेत मात्र त्यांच्या या प्रयत्नाला यश मिळाले पाहिजे असे मनोमन मानून सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे. आजच्या सत्कारमूर्ती एक सामान्य शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी जीवनामध्ये स्वप्न ठेवून प्रयत्न चालू ठेवले त्यामुळे स्वप्नपूर्ती झाली. स्वप्न साकार करायचे असतील तर परिश्रम करावे लागतील. परिश्रम हेच जीवनाचे सार आहे असे प्रतिपादन जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे नवनियुक्तांचा सत्कार करताना प्रमुख अतिथी म्हणून माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे बोलत होते ते पुढे म्हणाले की अशा यशस्वी विद्यार्थ्यांची प्रेरणा घेऊनच आपण ही आपल्या स्वप्नपूर्ती कडे जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपण  अडीअडचणीवर मात करून प्रयत्नशील रहाणे गरजेचे आहे.

         कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ आंबेडकर बाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे होते.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनी करताना म्हणाले की अशा सत्कारातून आपण काहीतरी शिकले पाहिजे अशा विद्यार्थ्यांचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. परिस्थितीची जाणीव आपण ठेवली पाहिजे जीवनात जे साध्य करायचे किंवा वडिलांच्या कष्टाचे चीज करायचे असेल तर कष्ट करणे महत्त्वाचे आहे . कष्टाला महत्त्व दिले तरच आपण पुढील आयुष्य सुखकर करू शकतो म्हणून कष्ट केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

     जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची माजी विद्यार्थिनी संध्या मारुती कोळगे यांची पीडब्ल्यूडी मध्ये टॅक्स असोसिएट पदावर नवनियुक्ती झाली. सध्या पुणे येथे साई बालाजी एज्युकेशन सोसायटीमध्ये शिकत असतानाच हे पद प्राप्त केले आहे. इयत्ता दहावी पर्यंत याच विद्यालयात शिक्षण घेतले . डॉ सानिका काकासाहेब पवार याही विद्यार्थिनीने सिंहगड डेंटल कॉलेज पुणे येथे दिमाकांत प्रवेश प्राप्त केला आहे. त्यामुळे दोघींचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते या प्रसंगी पार पडला. सत्कार मूर्तीनी आपले अनुभव याप्रसंगी विद्यार्थ्यांसमोर मांडले.

       याप्रसंगी माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे , प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके , श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, आत्माराम कोळगे , मारूती कोळगे , नंदकुमार पवार , शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.   

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित घोळवे तर आभार श्री  काकासाहेब डोंगरे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या