धाराशिव – प्रभाग 19 मध्ये उमेदवारीची जोरदार चाहूल
गणेश नगरच्या रणरागिनी ज्ञानेश्वरी राज निकम यांचा दमदार प्रवेश
प्रतिनिधी....मनोज जाधव
धाराशिव नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून शहरातील विविध प्रभागांत इच्छुकांचे अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 मधून ज्ञानेश्वरी अजित उर्फ राज निकम यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करून राजकीय वातावरणात चांगलीच चर्चा रंगवली आहे.
गणेश नगर परिसरातील रहिवासी असलेल्या ज्ञानेश्वरी राज निकम या समाजकार्य, धडाडी आणि तत्पर सेवाभावामुळे ‘गणेश नगरची रणरागिनी’ म्हणून ओळखल्या जातात. महिलांचे प्रश्न, परिसरातील समस्या आणि नागरिकांच्या अडचणी यावर वेळोवेळी आवाज उठविण्यात त्या अग्रणी राहिल्या आहेत.
जनसेवा हाच धर्म – नागरिकांचा विश्वासार्ह चेहरा
दिवस असो वा रात्र — कोणताही नागरिक मदतीसाठी संपर्क साधल्यावर काही मिनिटांत घटनास्थळी धाव घेऊन प्रश्न सोडविण्याची त्यांची कार्यशैली नागरिकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. सर्व जात-धर्मांतील नागरिकांशी त्यांनी घट्ट नाते निर्माण केले असून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे.
विरोधकांसाठी आव्हान वाढणार?
ज्ञानेश्वरी ताईंची लोकप्रियता, सामाजिक उपस्थिती आणि मजबूत राजकीय पाया लक्षात घेता या निवडणुकीत विरोधकांसाठी आव्हान वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरात अनेक राजकीय चेहरे असले तरी ‘काम करणारा चेहरा’ म्हणून नागरिकांची पहिली पसंती ज्ञानेश्वरी ताई आहेत.
गणेश नगरचा चेहरामोहरा बदलण्याचे स्वप्न
सक्षम, हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या ज्ञानेश्वरी राज निकम या आगामी काळात गणेश नगरचा सर्वांगीण विकास साधतील, असा विश्वास परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत. त्यांच्या रूपाने प्रभाग क्रमांक 19 ला एक कार्यक्षम आणि लढवय्या नगरसेवक लाभण्याची शक्यता अधिक बळकट होत आहे.
पुढील काही दिवस निर्णायक…
आगामी निवडणुकीत प्रभाग 19 मधील जनतेचा कौल कोणाकडे जाणार?
ज्ञानेश्वरी ताई राज निकम या प्रभागाचा चेहरा बदलणाऱ्या नव्या नगरसेवक ठरणार का?
हे पाहणे आगामी राजकीय घडामोडीत अत्यंत उत्सुकतेचे ठरणार आहे.


0 टिप्पण्या