Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जयप्रकाश विद्यालयाच्या चार खेळाडूंची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड


 जयप्रकाश विद्यालयाच्या चार खेळाडूंची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड


     प्रतिनिधी....मनोज जाधव 


रुईभर | 11 नोव्हेंबर

जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर यांनी यंदाही यशाची परंपरा कायम ठेवत चार खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरवत मोठे यश मिळवले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने लातूर येथे पार पडलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत विद्यालयातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत राज्यस्तरीय प्रवास निश्चित केला.


राज्यस्तरावर पात्र ठरलेले खेळाडू


सुरेश खाडे (इ.११वी विज्ञान) – सॉफ्ट टेनिस


सिद्धार्थ विधाते (इ.१२वी विज्ञान) – तलवारबाजी


सिद्धांत विधाते (इ.१२वी विज्ञान) – तलवारबाजी


गायत्री केवटे – सॉफ्ट टेनिस / लॉन्स टेनिस



तसेच दीक्षा माने (इ.१२वी विज्ञान) हिची तलवारबाजीत विभागीय स्तरावर निवड झाली आहे.


खेळाडूंचा सत्कार


यशस्वी खेळाडूंचा सत्कार माजी जि.प. सदस्य रामदास कोळगे, माजी ग्रा.पं. सदस्य राजनारायण कोळगे, आणि विद्यालयाचे प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. उपस्थितांनी सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


मार्गदर्शकांचे योगदान


खेळाडूंना क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक:

प्राचार्य जयप्रकाश कोळगे, प्रशांत कोळगे, अश्विनकुमार पवार यांनी विशेष प्रशिक्षण दिले.


अभिनंदन वर्षाव


डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे, प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके, स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.


कार्यक्रम चे


सूत्रसंचालन : प्रा. गणेश शेटे

         यांनी तर 

आभारप्रदर्शन : प्रा. प्रशांत कोळगे

       यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या