बरमगाव बू येथे संविधान दिन विविध उपक्रमांनी साजरा
प्रतिनिधी....अमर आगळे
धाराशिव : तालुक्यातील बरमगाव बू येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जि. परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या रॅलीने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
या रॅलीत संविधानाचा विजय असो, संविधान जिंदाबाद, अशा घोषणा देत रॅली गावातील संविधान चौक येथे आली. शालेय शिक्षण समिती अध्यक्ष बळीराम सिरसाठे व ग्रामसमृद्धी संस्थेचे अध्यक्ष अमर आगळे, सदस्य राजकुमार सिरसाठे यांनी या रॅलीचे जोरदार स्वागत केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार घालून पूजा करण्यात आली. शाळेतील विध्यार्थी यांनी एकमेकांच्या हातात हात घालून मानवी साखळी केली व जारदार घोषणा बाजी केली. त्या नंतर अमर आगळे यांनी संविधान प्रास्ताविक चे वाचन केले.
ही रॅली शाळेत घोषणा देत पोहचल्या नंतर शाळेत प्रतिमा पूजन करून विध्यार्थ्यानी भाषणे केली. शाळेतील शिक्षक मोरे सर, गोरे सर, माने सर, शिंदे मॅडम, जाधव मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले.
माने सर यांनी त्यांच्या भाषणातून संविधाना बद्दल सखोल माहिती विध्यार्थ्यांना दिली.
बळीराम सिरसाठे यांनी विध्यार्थी यांना खाऊ वाटप केला व कार्यक्रमांची सांगता झाली.


0 टिप्पण्या