रुग्णसेवेतील देवदूत केदार सौदागर
📍 तुळजापूर : प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मौजे सलगरा दिवटी या छोट्याशा गावातून उदयास आलेले नाव — केदार सौदागर!
आज जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालय, रक्तपेढी किंवा गरजू रुग्णांच्या ओठांवर ज्याचे नाव येते, तो म्हणजे आश्वासक रुग्णसेवक केदार सौदागर.
शिक्षणाने बी.ए., बी.एड. पदवीधर असलेले केदार यांनी नोकरीच्या मागे न लागता आपले जीवन “लोकसेवेच्या” मार्गाला अर्पण केले. मागील पाच वर्षांपासून ते निस्वार्थपणे रुग्णसेवा करत आहेत. या काळात त्यांनी हजारो रुग्णांना प्राणदान दिले असून, रक्तदान ते नेत्रदान अशा विविध क्षेत्रांमध्ये ते सतत अग्रस्थानी राहिले आहेत.
रुग्णालयात रक्ताची गरज असो, ब्लड डोनरची कमतरता असो, प्रसुतीसाठी मदत लागो किंवा गंभीर रुग्णासाठी तात्काळ सेवा आवश्यक असो किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून हजारो रुग्णाना लाखो रुपये ची मदत— सर्वप्रथम आठवणीत येणारे नाव म्हणजे ‘केदार सौदागर’!
नेत्रहीन रुग्णांसाठी त्यांनी नेत्रदान मोहिमेचे कार्य हाती घेतले असून, शेकडो रुग्णांना दृष्टीदानाचे वरदान मिळवून दिले आहे. त्यांच्या या अथक सेवेने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी आदर आणि विश्वास निर्माण झाला आहे.
आज केदार सौदागर यांचे कार्य फक्त त्यांच्या गावापुरते मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्यात प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
नोकरीच्या मोहापेक्षा समाजसेवा निवडून, “एक मिनिटही वाया जाऊ नये — ते लोकसेवेसाठीच द्यावे” या विचाराने ते कार्यरत आहेत.
---
🙏 त्यांची ओळख आज अशीच बनली आहे — ‘रुग्णसेवेचा खरा देवदूत — केदार सौदागर!’
--





0 टिप्पण्या