Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

ISRO चे अध्यक्ष डॉ. नारायणन यांच्या हातून रणजीत कागदे यांना पीएच.डी. पदवी


   
         ISRO चे अध्यक्ष डॉ. नारायणन यांच्या हातून रणजीत कागदे यांना पीएच.डी. पदवी

       प्रतिनिधी...मनोज जाधव 

अकलूज/प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील दसूर येथील रणजीत भारत कागदे यांनी संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी (Computer Science & Engineering) या विषयात पीएच.डी. पदवी संपादन करून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. ही पदवी त्यांना VelTech Rangarajan Dr. Sagunthala R&D Institute of Science and Technology, Chennai येथे नुकत्याच पार पडलेल्या १५व्या पदवीदान समारंभात प्रदान करण्यात आली.



या समारंभात अंतराळ विभागाचे सचिव तसेच इस्रो आणि स्पेस आयोगाचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांच्या शुभहस्ते कागदे यांना पीएच.डी. पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.


रणजीत कागदे हे सध्या मुंबईतील आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी औद्योगिक इंटरनेट ऑफ थिंग्स (IIoT), सेन्सर नेटवर्क्स, ऑटोमेशन सिस्टीम्स आणि डीप लर्निंग या विषयांवर महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे.


कागदे यांचे संशोधन मार्गदर्शक डॉ. एन. विजयराज यांनी त्यांच्या संशोधनाला योग्य दिशा दिली. कागदे यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधनपत्रे सादर केली असून त्यांच्या पाच संशोधन निबंधांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जर्नल्समध्ये मान्यता मिळाली आहे.


कागदे यांची शैक्षणिक वाटचाल :


प्राथमिक शिक्षण : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दसूर


माध्यमिक व उच्च माध्यमिक : सदाशिवराव माने महाविद्यालय, अकलूज


पदवी : बी.ई. (संगणक विज्ञान व अभियांत्रिकी), स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, पंढरपूर


पदव्युत्तर : एम.ई. (संगणक अभियांत्रिकी), सिंहगड इन्स्टिट्यूट, पुणे



कागदे यांनी अथक परिश्रम, संशोधननिष्ठा आणि उच्च तांत्रिक गुणवत्तेच्या जोरावर पीएच.डी. पदवी संपादन केली असून दसूर गावासह संपूर्ण तालुक्यातून त्यांच्या या यशाचे अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या