Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा 

मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412

दिनांक 23 1 2025 रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला यावेळी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन धाराशिव येथील प्राध्यापक रवी सुरवसे छत्रपती शिवाजी हायस्कूल धाराशिव  यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले त्यानंतर महानायक नेताजी सुभाष चंद्र बोस व हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर प्राध्यापक रवी सुरवशे प्रमुख पाहुणे प्रभाकर बनसोडे विजय गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त यांचे स्वागत कार्यालयाच्या वतीने शाल व ग्रंथ देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे यांनी केले यावेळी बोलताना प्राध्यापक रवी सुरवसे म्हणाले की मराठी भाषा संवर्धन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे मराठी भाषेचे जतन व्हावे प्रचार प्रसिद्धी व्हावी या उद्देशाने राज्यातील पालकांनी आपल्या पाल्यांना प्राधान्याने मराठी शाळेमध्ये प्रवेश द्यावा त्यामुळे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी निश्चितच मदत होईल शासनाच्या वतीने मातृभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने शासन मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करत आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोना तावडे यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रफुल्ल राठोड यांनी केले कार्यक्रमासाठी शिवशंकर कटाळे व विजयसिंह सिसोदे यांनी परिश्रम घेतले यावेळी उपस्थित लक्ष्मण भानुसे व वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामध्ये  स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे एमपीएससी यूपीएससी चे विद्यार्थी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या