Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.प्रताप सरनाईक यांचा दोन दिवसीय जिल्हा दौरा...

मंत्री श्री. प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री धाराशिव जिल्हा यांचा २५ ते २६ जानेवारी २०२५ रोजी धाराशिव दौरा ठरवण्यात आलेला आहे.

मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412

२५ जानेवारी २०२५

मंत्री श्री. सरनाईक सकाळी १०.३० वाजता बांद्र्यातून वाहनाने प्रवास सुरू करणार असून, ११.०० वाजता सांताक्रुज येथील General Aviation Terminal वरून खाजगी विमानाने धाराशिव कडे प्रयाण करणार आहेत. १२.४५ वाजता धाराशिव विमानतळावर आगमनानंतर, तुळजापूर येथील माता तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन २.१५ वाजता धाराशिवकडे परतणार आहेत.

सायं. ५.०० वाजता मंत्री श्री. सरनाईक धाराशिव आगार भेट देणार असून, ६.०० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर शिवसेना व मित्रपक्षातील कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी वेळ राखीव ठेवण्यात आलेला आहे.

२६ जानेवारी २०२५

रविवारी सकाळी ९.१५ वाजता प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम पोलीस परेड मैदानावर होईल. तिरंगा रॅलीला ९.५० वाजता स्वागत होईल. यानंतर मंत्री श्री. सरनाईक जिल्हा नियोजन समितीची बैठक आणि तुळजापूर देवस्थान विकास आराखड्याचे सादरीकरण करणार आहेत.

दुपारी १२.३० वाजता पत्रकार परिषद होईल. नंतर, शासकीय विश्रामगृह येथे प्रस्थान व राखीव कार्यक्रम होईल. सायं. ४.४५ वाजता मंत्री श्री. सरनाईक खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या