धाराशिव एसटी महामंडळ प्रवाशांच्या भावनेशी खेळत असलेला जळजळीत वास्तव मांडणारा लेख....
परिवहन मंत्री ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्याच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना शिस्त लावतील का....
डेपो मॅनेजर यांनाच नेमकं उत्तर देता आलं नाही...
मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412
परिवहन मंत्र्यांनी धाराशिव जिल्हा हा पालकमंत्री पदाची जिम्मेदारी म्हणून स्वीकारला व या जिल्ह्याला पालकमंत्री होताच पहिल्याच दिवशी नवीन कोऱ्या करकरीत 25 बसेस दिल्या परंतु धाराशिव येथील धाराशिव आगार विभागातील कर्मचारी वर्गाला शिस्त नसल्याने प्रत्यक्ष मात्र ज्यावेळेस बस सुटायला पाहिजे त्यावेळेस न बस सुटता प्रत्येक गाडी एक तास उशिराने सुटत आहे यामुळे प्रवाशांची हेळसांड होत असून प्रवाशांच्या भावनेशी नेमकं अधिकारी वर्ग का खेळत आहेत हा प्रश्न मात्र प्रवाशांना नेहमी पडलेला असतो अनेक प्रवाशांनी वेळोवेळी तक्रारी करूनही त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत आज सकाळी मुंबई गाडी साठी सात वाजता आलेल्या प्रवाशांनी आठ वाजता ही गाडी न सुटल्याने असता ही बाब माझ्या निदर्शनास आली असता मी त्यांचे कर्मचारी राठोड यांच्याशी फोनवरून बोललो असता मात्र त्यांनी आम्हाला नवीन गाड्या आले असून त्या नवीन गाड्यांसाठी डिझेल आले नाही असे उत्तर दिले परिवहन मंत्री ना.प्रतापराव सरनाईक या गोष्टीकडे गांभीर्याने घेतील का आणि धाराशिव जिल्ह्यातील खोळंबलेली प्रवासी वाहतूक व कर्मचाऱ्यांची मुजोरी मोडीत काढून सर्वसामान्य जनतेला लाल परीचा सुखरूप व वेळेवर प्रवास उपलब्ध करून देतील का आता हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे
0 टिप्पण्या