Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

*शासकीय महिला रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी अधिकारी यांचा उत्कृष्ट सेवाबद्दल रुग्ण कल्याण समितीच्या वतीने गौरव.

*शासकीय महिला रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी अधिकारी यांचा उत्कृष्ट सेवाबद्दल रुग्ण कल्याण समितीच्या वतीने गौरव..*

मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412

धाराशिव :- शासकीय महिला रुग्णालय धाराशिव येथे जिल्ह्यातीलच नव्हे तर पर जिल्ह्यातील देखील गरोदर माता डिलिव्हरी साठी येतात.त्यांना चांगल्या प्रकारची आरोग्य सुविधा पुरविण्यात येऊन डिलीव्हरी चांगल्या प्रकारे करतात.आरोग्य उपचार व आरोग्य सुविधा चांगल्या पद्धतीने दिल्याबद्दल रुग्ण कल्याण समिती धाराशिव यांच्या वतीने या कर्मचाऱ्यांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला,शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय चाकुरकर, तालुकास्तरीय बाल संरक्षण समिती तथा इथिकल कमिटी सदस्य गणेश वाघमारे,आरोग्य मित्र शेख रौफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार केल्याबद्दल महिला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षका डॉ.स्मिताताई गवळी यांनी सन्मानीत केल्या बद्दल रुग्ण कल्याण समिती व जिल्हा शल्य चिकित्सक यांचे आभार मानले,डॉ.धनंजय चाकुरकर यांनी म्हटले की,महिला रुग्णालयात आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी तेथील कर्मचारी डॉ.अधिकारी काळजीपुर्वक कर्तव्य बजावुन आरोग्य सुविधा देत आहेत तेथे कर्मचारी वर्ग कमी असुन देखील ते उत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.बाल संरक्षण समिती तथा इथिकल कमिटी सदस्य गणेश वाघमारे यांनी सर्व सत्कार मुर्तीचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा शिल्लक चिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर, वैद्यकीय अधीक्षका,सर्जन डॉ स्मिताताई गवळी, तालुकास्तरीय बाल संरक्षण समिती तथा इथिकल कमिटी सदस्य गणेश वाघमारे, आरोग्य मित्र शेख रऊफ,डॉ.राहुल वाघमारे, डॉ.बाळासाहेब घाडगे, डॉ.रामढवे,डॉ.आदटराव, डॉ.बलवंडे,डॉ.राजेश,स्वप्नील कानडे,डॉ.शंकर,डॉ.रेखा टिके, डॉ.आयेशा,मेट्रन श्रीमती चव्हाण,प्र.मेट्रन रिबेका भंडारे,के व्ही मराठे,शामल गोसावी,अश्विनी सोमासे, रेश्मा शेख,जिरीना परसे, अश्विनी बनसोडे,जयश्री वाघमारे,अस्ताज तांबोळी, पुनम पानढवळे,मनीषा साळुंखे,मनीषा बसपुरे,रेखा जाधव,अंजना कदम,माधुरी जाधव,अश्विनी बांगर,सलमा सय्यद,कल्पना थोरात,रूपाली सुरवसे,दिपक माळी सह अन्य इतरांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष पोतदार यांनी केले तर आभार सिद्धार्थ जानराव यांनी मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या