*विद्यार्थी आहात विद्यार्थी म्हणुन शिक्षण क्षेत्रात नामवंत व्हा..* सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे.
मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412
धाराशिव :-दि.11 फेब्रुवारी इयत्ता बारावी म्हणजे आजपासून व दि. 21 तारखेपासून इयत्ता दहावी ची बोर्ड परीक्षा चालू होत आहे,विद्यार्थ्यांनी निसंकोच पणे,कोणत्याही आमिषाला व दडपणाखाली न येता मुक्तपणे हसत व आनंदाने परीक्षा द्याव्यात.शासनाच्या नियम अटीनुसार कॉफी मुक्त परिक्षा हव्यात यासाठी शिक्षण विभागासह जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे,काही विद्यार्थी ग्रामीण भागातुन येतात तर काही शहराच्या कानाकोपऱ्यातुन परीक्षा देण्यासाठी येतात, परीक्षा साठी जाणारे विद्यार्थी पायी जात असतील किंवा गाडीची वाट बघत असतील तर त्या विद्यार्थ्यांना जे कोणी त्या रस्त्यावरुन जात असतील त्यांनी त्या विद्यार्थ्यांना त्याच्या परीक्षा केंद्रावर सोडुन एक विद्यार्थी दशेतील आपला काळ आठवुन कर्तव्य बजावा.कॉफीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात न राहता विद्यार्थ्यांनी परीक्षा द्याव्यात.दहावी आणि बारावी हा शैक्षणिक विद्यार्थ्यांचा मुलभुत पाया आहे असे समजावे.शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांच्या भावना समजुन त्यांना योग्य ते सहकार्य करावे,विद्यार्थ्यांनी शासनाच्या कॉफीमुक्त परीक्षा मध्ये जे काही नियम अटी आणि आदेश दिलेले आहेत त्याचे पालन करावे,तुमच्या भवितव्यासाठी तुमचे आई वडिल अपार कष्ट घेत आहेत,भावनिक न होता विद्यार्थी म्हणुन शिक्षण क्षेत्रात नामवंत व्हा..सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा निमित्त खुप खुप शुभेच्छा ..🌹
गणेश रानबा वाघमारे
सामाजिक कार्यकर्ता तथा
सदस्य,तालुकास्तरीय बाल संरक्षण समिती धाराशिव.
0 टिप्पण्या