जयप्रकाश विद्यालयत रंगाची उधळण...
मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412
रुईभर :- दि . 19 मार्च रोजी - जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे विद्यालयात रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयात प्रत्येक सणाचे महत्त्व विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावे हाच उद्देश समोर ठेवून सर्व महापुरुषांच्या जयंती, सण , विविध कार्यक्रम साजरी केले जातात. त्यातीलच एक भाग म्हणून रंगपंचमी सर्वशिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी आनंद उत्साह साजरी केला.
डॉ आंबेडकर बालिक विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे, माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य श्री राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे यांच्याकडून अशा उत्साहाला हमेशा प्रोत्साहन देऊन सर्वांना आनंद लुटण्याचा क्षण देत असतात.
0 टिप्पण्या