*शहर उपजिविका आराखडा समितीची बैठक संपन्न..*
धाराशिव :- दि.२० मार्च रोजी ठिक ११ वाजता धाराशिव नगर परिषद येथे मुख्याधिकारी वसुधा फड यांच्या मार्गदर्शनाखाली दिनदयाळ उपजिविका योजना अंतर्गत शहर उपजिविका कृती आराखडा (CLTF) समितीची बैठक समितीच्या अध्यक्षा तथा मुख्याधिकारी यांच्या दालनात संपन्न झाली.या बैठकीस पृथ्वीराज पवार,उप मुख्याधिकारी,महेबुब सय्यद,सहा.मोटार वाहन निरीक्षक,आरटीओ विभाग,सु.न.जाधव उपसंचालक सांख्यिकी कार्यालय,व्यंकट कुलकर्णी, उपकार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग,सुधाकर कोनाळे,सरकारी कामगार अधिकारी यांचे प्रतिनिधी वैभव गोरे,चिन्मय दास LDM, सुनिल जमादार EGS समन्वयक,प्रा.मारुती लोंढे, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,गणेश रानबा वाघमारे सामाजिक कार्यकर्ता,रामेश्वर पेठे पथविक्रेता समिती सदस्य प्रतिनिधी,डोलारे एस एच, जिल्हा कौशल्य,उद्योजकता व नाविन्यता विभाग,तसेच सर्व विभाग प्रमुख गोरोबा आवचार,रमाई आवास योजना,श्री भापकर अभियंता पाणी पुरवठा , सुरेश कोरे,तेजस्विनी पंखे,PMAY विभाग,युसुफ शेख,DAYNULM विभाग नगर परिषद सह इतर उपस्थित होते.सदर बैठकी मध्ये खालील विषयांवर सविस्तर मार्गदर्शन मुख्याधिकारी तथा समिती अध्यक्षा वसुधा फड यांनी केले.१) दिनदयाळ जन आजीविका योजना बाबत माहिती देण्यात आली.२) शहर उपजिविका कृती आराखडा समितीची स्थापना करुन समितीच्या जबाबदा-या विषयी चर्चा करण्यात आली.३) शहर उपजिविका कृती आराखडा (CLAP) विषयी चर्चा करण्यात आली.तसेच शहराचा पुढील पाच वर्षाचा उत्कृष्ट कृती आराखडा (C-LAP) तयार करण्याबाबतचे पुर्व नियोजन करण्यात आले,४) CLTF च्या सदस्यांच्या शंकाचे निरसन व चर्चा करण्यात आली.सदर बैठकीचे प्रस्ताविक वैशाली आवाड शहर अभियान व्यवस्थापक DAYNULM यांनी केले.तर आभार प्रदर्शन सतीश सांगळे शहर अभियान व्यवस्थापक यांनी केले.
0 टिप्पण्या