*रूईभर महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी*
रूईभर – दि. 12 मार्च 2025 रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या अभ्यास केंद्रांतर्गत श्री. स्वामी समर्थ कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, रूईभर येथे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
डॉ. आंबेडकर बालविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सुभाषदादा कोळगे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या योगदानावर बोलताना म्हणाले की आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, कृषी, औद्योगिक, सहकार, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात राज्याला दिशा देणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वगुणांमुळे महाराष्ट्राने मोठी प्रगती केली असल्याचे मत व्यक्त केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्य संतोष कपाळे यांनी विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी कार्यक्रमास माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे , प्रा धनाजी भोसले , प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या