Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

तुळजापूर तालुक्यातील येडोळा येथे काँग्रेसला खिंडार : माजी सरपंच प्रभाकर पाटीलसह अनेक मात्तबर कार्यकर्ते भाजपात

तुळजापूर तालुक्यातील येडोळा येथे काँग्रेसला खिंडार : माजी सरपंच प्रभाकर पाटीलसह अनेक मात्तबर कार्यकर्ते भाजपात


राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणाऱ्या तुळजापूर तालूक्यातील येडोळा गावातील राष्ट्रीय काँग्रेसचे माजी सरपंच प्रभाकार पाटील यानी आपल्या समर्थकासह भाजपामध्ये प्रवेश केल्याने बालेकिल्ल्यास कॉग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.

भाजपाची विचार धारा पटल्यामुळे तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राणाजगजितसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावच्या विकासाकरित आपण भारतिय जनता पार्टीत प्रवेश करित आहोत. अशी प्रतिक्रिया येथील माजी सरपंच प्रभाकर पाटील यानी भाजपात प्रवेश केल्यानंतर व्यक्त केली.

तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे विद्यामान आमदार राणाजगजितसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली येडोळा गावचे माजी सरपंच प्रभाकर पाटील, ग्रा. प. सदस्य दिगंबर पाटील, यानी भाजपात प्रवेश केला. या वेळी शिवाजी जाधव, बाळु जाधव, सुधिर परिहार, सिध्दू अण्णा कोरे, दिपक जाधव, भिवा इंगोले, नेताजी पाटील, अंगद इंगोले, विवेकानंदमिलगीरेसह कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या