जयप्रकाश विद्यालयात उजास उपक्रमांतर्गत सॅनिटरी पॅडचे वाटप
प्रतिनिधी ...शहाजी आगळे
रुईभर :- दि ११ एप्रिल रोजी जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे उजास उपक्रमांतर्गत सॅनिटरी पॅडचे मुलींना मोफत वाटप करण्यात आले.
आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेच्या उजास या उपक्रमांतर्गत श्रीमती वैष्णवी सावंत (फॅसिलीटेटर, धाराशिव जिल्हा ) यांनी शैक्षणिक वर्ष 2024 -25 मध्ये सत्राच्या माध्यमातून मासिक पाळी संदर्भातील गैरसमजुती व त्याबद्दल जनजागृती करण्यात आली. जनजागृतीमुळे मासिक पाळीतील अंधश्रद्धा व गैरसमज दूर होऊन त्याची काळजी घेण्यास मदत होते. कापड किंवा कापडी पॅड व सॅनिटरी पॅड या दोन्हीचे फायदे तोटे त्यांची निवड करणे व त्याचा वापर करताना घ्यावयाची काळजी, वयोमानानुसार शारीरिक बदल या सर्वांची सखोल माहिती या प्रसंगी त्यांनी दिली . त्यातीलच एक मासिक पाळी होय त्यावरील उपाय व व्यायामाचे महत्त्व सांगितले. यावेळी चौरस आहार घेणेही तेवढेच आवश्यक आहे. याची सखोल माहिती विद्यार्थिनींना सांगितली. विद्यालयातील मुलींसाठी ८००० सॅनिटरी पॅड मिळाले. विद्यालयाचे प्राचार्य श्री जयप्रकाश कोळगे यांच्या मागणीला व सततच्या पाठपुराव्याला यश मिळाले.
प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनी श्रीमती वैष्णवी सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे, माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे रुईभर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री दुधंबे साहेब, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार व मुख्याध्यापक अमरसिंह गोरे यांची विशेष उपस्थिती लाभली...
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री अभिजीत घोळवे यांनी मानले.
0 टिप्पण्या