Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जयप्रकाश विद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी...

जयप्रकाश विद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

प्रतिनिधी...शहाजी आगळे 

       रुईभर : - दि. १४ एप्रिल - जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
     डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी श्री सुभाष दादा कोळगे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर  यांच्या प्रतिमेस पुष्पहार व श्रीफल अर्पण करण्यात आले.
     भारतीय संविधानाचे वाचन कुमार आयुष किरदत यांने केले.
      विद्यालयातील सहशिक्षक श्री आकाडे  ए जे यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थाध्यक्ष शिक्षण महर्षी सुभास दादा कोळगे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
         याप्रसंगी  माजी जि.प. सदस्य श्री रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य श्री राजनारायण कोळगे , प्रशासकिय अधिकारी श्रीमती शिवकन्या सांळुके , प्राचार्य जयप्रकाश कोळगे ,  इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री नानासाहेब शेलार , पर्यवेक्षक श्री डोंगरे काकासाहेब, श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य श्री संतोष कपाळे, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार श्री अभिजित घोळवे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या