श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी भाग्यश्री सुरवसे यांची मुंबई पोलीस दलात निवड
मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412
रुईभर : - दि 3 मार्च रोजी उंबरेगव्हाण (ता. धाराशिव) येथील वारकरी कुटुंबातील कन्या भाग्यश्री सुरवसे यांनी कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर मुंबई पोलीस दलात स्थान मिळवले आहे. श्री. स्वामी समर्थ कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, रूईभर येथील अभ्यास केंद्रात शिक्षण घेत आहेत.
या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री. सुभाष दादा कोळगे यांच्या हस्ते भाग्यश्री सुरवसे व त्यांच्या आई-वडिलांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही मेहनत आणि जिद्द यांच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री. सुभाषदादा कोळगे यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील शासकीय सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी माजी जि प सदस्य श्री रामदास आणणा कोळगे, माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे, श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, प्रा भोसले सर, पर्यवेक्षक डोंगरे के ए, महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या