Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

शाळा ही फक्त इमारत नसुन संस्काराची कार्यशाळा आहे -प्राचार्य जयप्रकाश कोळगे


 प्रतिनिधी....मनोज जाधव 

       रुईभर :- दि 16 जून रोजी  विद्यार्थ्यांचे स्वागत उत्साहात होते तसेच उत्साहात शिक्षण घेवून जीवन उज्ज्वल करावे. वाद्याच्या स्वरात विद्यालयात स्वागत केले मात्र हाच उत्साही स्वर शिक्षणासाठी ठेवला तर जीवन यशस्वी होते. नवीन विद्यार्थ्यांना नवीन अनुभव घेण्याची संधी यातून प्राप्त होते. आपल्या विद्यालयाचे नियम सर्वांनी पाळावेत, नियमाचे काटेकोर पालन करून आपण हे सुसंस्कारी बनावे. शाळा ही फक्त इमारत नसुन संस्काराची कार्यशाळा आहे असे प्राचार्य जयप्रकाश कोळगे  प्रास्ताविक भाषणात   जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रमात बोलत होते.

       विद्यार्थ्यांना स्कूल बस मध्ये बसून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दुपारी मध्यान भोजनात गोड पदार्थ शिरा विद्यार्थ्यांना देण्यात आला.

       मा श्री मुस्तफा खोंदे, नायब तहसीलदार, औसा यांनीही नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्साहात भाग घेऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.    

       विद्यालयाच्या प्रांगणात डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. प्रत्येक विद्यार्थ्यांना पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.   

        कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की प्रत्येक विद्यार्थ्यानी आनंदी राहून शिक्षण घेतले पाहिजे. हाच आनंद वर्षभर असला पाहिजे. जीवनात अभ्यास तर महत्त्वाचा आहे मात्र संस्कार रुजवणे महत्त्वाचे आहे. जसे आपण देवळात जाऊन देवाचे दर्शन दररोज घेतो तसेच आपण आपल्या दिवसाची सुरुवात आई-वडिलांच्या दर्शनानी झाली पाहिजे. शाळेत सर्व गुरूंचा मान सन्मान करावा आपण शिक्षण घेऊन उच्च पदावर विराजमान होण्याचा प्रयत्न प्रत्येकानी केला पाहिजे. शिक्षणाबरोबर संस्कारी बनून उच्च पद मिळवण्याचा प्रयत्न जीवनात करणे आवश्यक आहे अशी अपेक्षा व्यक्त केली.    

       प्रशासकीय अधिकारी श्रीमती शिवकन्या साळुंके यांनीही मार्गदर्शन करताना म्हणाल्या की जीवनाचा मार्ग शोधण्यासाठी शिक्षण महत्वाचा टप्पा आहे. प्रत्येकानी नियमित शाळेत येऊन अभ्यास करावा. आपल्यातील क्षमता वाढवून जीवनात नव  चेतना निर्माण करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

       याप्रसंगी माजी जि प सदस्य श्री रामदासआण्णा कोळगे, माजी ग्राप सदस्य श्री राजनारायण कोळगे, श्री स्वामी समर्थ कला विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य श्री संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मु अ श्री नानासाहेब शेलार, श्री बळवंत दळवी, श्री अशोक सिरसाटे, प्रशांत चव्हाण, बाबासाहेब सिंदफळे , शिक्षक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. 

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन कांबळे यांनी तर आभार श्री नानासाहेब पवार यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या