Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जिल्हा सहाय्यक आयुक्त पदी त्रिंबकराव ढेंगळे पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल मतदार जनजागरण समितीच्या वतीने भारतीय संविधान उद्देशिका व विश्लेषण प्रत देऊन स्वागत तर नागरी समस्या बाबत दिले निवेदन..


    प्रतिनिधी ....मनोज जाधव 

धाराशिव :- जिल्हा सहायक आयुक्त पदी त्रिंबकराव डेंगळे पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल मतदार जनजागरण समितीच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारतीय संविधान उद्देशिका व विश्लेषण पत्रक आणि घटनेचे गणराज्य सुरु होतांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन घटनाक्रम हे छोटेसे पुस्तक देऊन शुभेच्छा देण्यात आल्या, तसेच धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण,शहरातील रस्ते,नाल्या,विज,स्वच्छता,भाजी मंडई, सार्वजनिक शौचालय,मुतारी, बगीचा, वयोवृद्धांसाठी पार्क,अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली व तशा प्रकारचे लेखी निवेदन दिले, मतदार जनजागरण समितीच्या वतीने करण्यात येणारे संविधान व मतदार याविषयीच्या कार्याविषयी त्यांनी समितीचे कौतुक केले यावेळी अब्दुल लतीफ,गणेश वाघमारे,शेख रौफ, संजय गजधने,युसुफ सय्यद, प्रदीप पांढरे,आविनाश मुंढे,श्रीकांत गायकवाड,आप्पा सिरसाठे,सह इतर  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या