Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जयप्रकाश विद्यालयात गुणवंतांचा सत्कार


    प्रतिनिधी....मनोज जाधव 

           रुईभर : -११ जुलै रोजी जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे गुणवंतांचा सत्कार डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी सुभाष दादा कोळगे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख अतिथी  उद्योगजक मा. श्री.रणजीत भैय्या चव्हाण (गौरव समिती अध्यक्ष ) यांच्या उपस्थितीत समारंभ संपन्न झाला.

            कै अविनाश भाऊ चव्हाण यांच्या स्मरणार्थ औरंगाबादचे उद्योगपती व रुईभरचे सुपुत्र रणजीत भैय्या चव्हाण हे दरवर्षी २५००० (हजार ) रुपयांचे रोख बक्षीस व सन्मानपत्र एन एम एम एस परीक्षा, इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांना देतात.

            कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी श्री सुभाष दादा कोळगे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की कै अविनाश भाऊ चव्हाण हे संभाजी नगर येथे नामांकित उद्योगपती असून देखील आपल्या गावाशी नाळ जोडून ठेवली होती. आपल्या गावासाठी काहीतरी करायचे म्हणून प्रत्येक वर्षी आपल्या विद्यालयास भेट देत असत. त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र युवा उद्योगपती रणजित भैय्या चव्हाण यांनी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्ती देऊन त्यांनी ही गावाची आपुलकी जपली. त्यांनी जसे कार्य करून यश संपादन केले तसेच आपणही गुणवंत विद्यार्थी बनून उच्च पदावर जाऊन नावलौकिक करावा. तसेच अभ्यासाबरोबरच सामाजिक परिस्थितीची ही जाणीव करून घेतली पाहिजे. सतत कार्यक्षम व कठोर परिश्रम करून गुणवंत विद्यार्थी बनावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

           प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनी प्रास्ताविक भाषण केले आपण कितीही श्रीमंत झालो तरी आपल्या गावाशी असलेले आपुलकी आपण जपली पाहिजे हे रणजीत भैय्या चव्हाण यांच्या कार्यातून आपल्याला दिसून येते विद्यार्थ्यांनी पुस्तकीय ज्ञानाबरोबरच प्रत्येक व्यक्तीशी आपुलकीचे संबंध जपले पाहिजेत शाळेत मिळणारे ज्ञानाचे व संस्काराचे धडे जीवनात कामी येतील आई वडील शिक्षक हे जीवनाला दिशा देतात त्यांच्या श्रमाचे फलित दाखवायचे असेल तर अभ्यास करून पुस्तकाच्या पुढे झुकेल तो जीवनात कुठेही कोणापुढे हे झुकणार नाही कष्ट व श्रमशिवाय पर्याय नाही स्पर्धेचे व तंत्रज्ञानाचे युग आहे त्यात आपण टिकले पाहिजे जीवनात उंच भरारी घ्यावी व त्याचा अभिमान गर्व आपल्यामध्ये येऊ देऊ नये आपला आत्मविश्वास जागृत ठेवा गर्वाने मोठे न होता संस्कार व ज्ञानाने मोठे व्हावे असे अपेक्षा व्यक्त केली

       माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे आपल्या भाषणात म्हणाले की प्रत्येक विद्यार्थ्यांनी परिश्रम करून स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. गुणवंत विद्यार्थ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपले भविष्य घडवू शकतो. ज्याप्रमाणे रणजीत भैय्या चव्हाण यांनी देश-विदेशात नाव केले तसे आपणही आपल्या कार्यातून देश विदेशात नाव लौकिक केले पाहिजे रंजीत भैय्या देशमुख यांच्या उद्योग गातील 22 देशात उत्पादन जाते म्हणजे रुईभर गावचा नाव लौकिक सातासमुद्रापार केला आहे म्हणून आपल्या अंगी जिद्द बाळगून संकटावर मात करून उंचीवरचे यश गाठण्याची अपेक्षा व्यक्त केली. 

  माजी मुख्याध्यापक श्री आगातराव भोईटे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की उद्योजक रणजीत भैय्या चव्हाण दातृत्व व नेतृत्व त्यांच्यात पहायला मिळते गुणवत्ता बरोबर श्रीमंत व सुसंस्कारी बनले पाहिजे. स्पर्धा जिंकतो तेव्हा इतरापेक्षा तो सरस असतो . असे दातृत्व देणारे लोक आहेत. तसेच भविष्यात श्रीमंत होवून समाजातील गरीबांसाठी मदत करणारे बनावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

          इयत्ता आठवीतील एन एम एम एस परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यात श्रद्धा गुंड, शिवम गडीकर  यांना सन्मानित करण्यात आले. 

          इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यात अक्षरा धनके, यश गव्हाणे, स्वराली घोडके, समीक्षा घोडके, श्रुती शिंदे यांना सन्मानित करण्यात आले. 

           इयत्ता बारावीतील विज्ञान शाखेत गुणवंत विद्यार्थ्यात धनश्री जाधव, प्रज्ञा मरगणे, समीक्षा मुंडे, अनुष्का काटवटे यांना सन्मानित करण्यात आले.

       इयत्ता बारावीतील कला शाखेत गुणवंत विद्यार्थ्यात स्नेहा रणशिंगे, फिजा शेख, मोहिनी रणशिंगे यांना सन्मानित करण्यात आले.

            याप्रसंगी माजी ग्रा प सदस्य श्री राजनारायण कोळगे , प्रशासकिय अधिकारी श्रीमती शिवकन्या साळुंके , श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य श्री संतोष कपाळे,  इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री नानासाहेब शेलार , पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे , श्रवण जाधव , संताजी मुंडे , रमेश मरगणे, अमृत सुरवसे , नानासाहेब गुंड , अमोल शिंदे , बालाजी घोडके ,   शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपास्थित होते.

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा गणपती शेटे तर आभार  श्री सचिन कांबळे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या