प्रतिनिधी...मनोज जाधव
रुईभर :-दि 10 जुलै रोजी गुरुविना जीवन असते. जीवनात गुरु शिवाय परिवर्तन होत नाही. आपले पहिले गुरू आपले आई-वडील असतात. आई-वडिलानंतर गुरुजन आपले आदर्श असतात. जीवनात गुरूला महत्त्व आहे. गुरुजन आपल्या ज्ञानवृद्धीमध्ये महत्त्वाचे स्थान असतात. त्यांचे मार्गदर्शन आपल्या आयुष्यातील परिवर्तनासाठी महत्त्वाचे ठरते. आई-वडील व गुरु यांनी दिलेले संस्कार टिकले पाहिजेत ते संस्कार आपल्या जीवनात अमर रहातात. दररोज आपल्या आई-वडिलांचे गुरूंचे दर्शन घ्यावे त्यामुळे आपल्या नम्रता हा गुण वाढीस लागतो. त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला काहीही कमी पडत नाही म्हणून गुरु विना जीवन व्यर्थ असते असे प्रतिपादन जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य जयप्रकाश कोळगे बोलत होते.
सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा याप्रसंगी त्यांनी दिल्या.
याप्रसंगी डॉ आंबेडकर बालिका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे, माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके , श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत घोळवे तर आभार प्रा प्रशांत कोळगे यांनी मानले.
0 टिप्पण्या