Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

धाराशीच्या तहसीलदार जाधव मॅडम यांनी केली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी.....


 

प्रतिनिधी...मनोज जाधव 


           सध्या धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं असून अवेळी आलेल्या पावसाने रब्बी हंगामातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मात्र कंबरडे मोडले असून राज्य सरकारने मात्र या गोष्टीची दखल घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ भरीव मदत करावी अशी मागणी जोर धरत आहे...


         रुईभर येथील नानासाहेब पवार यांचे झाले लाखो रुपयांचे नुकसान....

   

       धाराशिव तालुक्यातील मौजे रुईभर येथील कांदा उत्पादक शेतकरी नानासाहेब पवार यांच्या शेतातील रब्बी हंगामातील कांदा पिकाचे अवकाळी पावसाने लाखो रुपयांचे नुकसान झालं असून त्यांचा कांदा जवळपास शंभर टक्के खराब झाला आहे...



निवेदनाची दखल घेऊन तहसीलदारांनी थेट बांधावर जाऊन केली पाहणी ...


         सदरील शेतकऱ्यांनी लेखी  तक्रार दिली असता त्यांच्या या पत्राची दखल घेऊन धाराशिव तहसील कार्यालयाच्या तहसीलदार जाधव मॅडम यांनी थेट रुईभर गाव गाठत शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामा करून शासन स्तरावर सर्व हकीकत कळवली असल्याचे समजते,या वेळी त्यांच्या सोबत गावचे तलाठी पाचकुडवे हजर होते....


         जिल्ह्यात हजारो हेक्टर वरील रब्बी हंगामात कांदा पिकाचे उत्पादन घेतले जाते त्यामुळे कांदा उत्पादक व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने तत्काळ मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या