प्रतिनिधी...मनोज जाधव
मेडसिंगा गावातील युवा नेते संभाजी फरताडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.....
भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले....
कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली यातून युवकांना देश भक्तीचा संदेश देण्यात आला...मी
गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार...
गावातील दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या या सत्कारातून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला....
गावातील सर्वात ज्येष्ठांचा सत्कार...
गावातील सर्वात वयाने ज्येष्ठ असलेले श्री विश्वनाथ शित्रे यांनी वयाची 95 वर्षे पूर्ण केल्याने त्यांचाही सत्कार करून सन्मान करण्यात आला...
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार.....
गावातील ज्या ज्या युवकांनी व नागरिकांनी गावाच्या जडणघडणीसाठी व गावाचे नाव उज्वल करण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा सर्वांचा सत्कार या वेळी करण्यात आला....यात प्रामुख्याने सामाजिक,शैक्षणिक,राजकीय, कला व क्रीडा,आरोग्य सेवा तसेच आधुनिक शेतकरी, आशा कार्यकर्ती आदर्श सरपंच यांचा समावेश करण्यात आल्याचे दिसून आले....
या वेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष हभप श्री ज्ञानेश्वर रावसाहेब सूर्यवंशी पाटील यांनी सांगितले की गुणवंतांचा सत्कार करण्यासाठी अगोदर आपण स्वतः गुणवंत आणि संस्कारक्षम असावे लागते आणि संभाजी हे स्वतः गुणवान तर आहेतच पण ते संस्कारक्षम सुद्धा आहेत त्या मुळेच त्यांनी असा आदर्श घालून देणारा वाढदिवस साजरा करण्याचा चांगला पायंडा पाडला आहे असे म्हटले.... या वेळी दत्ता बाबा आगळे,सिद्धेश्वर जाधव व वैभव आगळे यांची भाषणे झाली....
संयोजन टीमने केले परिपूर्ण नियोजन...
वाढदिवस साजरा करण्यासाठी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद लांडगे यांनी केले तर आभार शुक्राचार्य शेलार यांनी मानले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमण आगळे,समाधान भोरे,गणेश शित्रे,अनिल फरताडे,अजय फरताडे, यांनी परिश्रम घेतले या वेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी हजर होते
0 टिप्पण्या