📚 नगर वाचनालय धाराशिवचे ग्रंथपाल सुयोग जोशी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎉
प्रतिनिधी....मनोज जाधव
धाराशिव जिल्ह्यातील ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या नगर वाचनालयाचे ग्रंथपाल सुयोग जोशी यांचा आज वाढदिवस . अत्यंत नम्र, अभ्यासू आणि पुस्तकांची आवड जोपासणारे श्री. जोशी यांनी गेल्या अनेक वर्षांत वाचनालयातील सेवा अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणे बजावली आहे.
वाचन संस्कृतीला चालना देणारे उपक्रम, शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे तसेच वाचन प्रेरणा मोहिमांसाठी ते नेहमीच पुढाकार घेतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे नगर वाचनालयाने एक सामाजिक सांस्कृतिक केंद्र म्हणून विशेष ओळख निर्माण केली आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
💐 "आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यशस्वी आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!" 💐
0 टिप्पण्या