प्रतिनिधी....मनोज जाधव
धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे धाराशिव येथे जिल्हाधिकारी या पदावर रुजू होण्यापूर्वी कोकणातील समृद्ध अशा कोकणपट्ट्यात यापूर्वी रत्नागिरी येथे जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून काम पाहत होते त्या ठिकाणची वनसंपदा ही अतिशय सुंदर व संपूर्ण कोकण हिरवाईने नटलेला आणि याच ठिकाणी त्यांना काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर त्यांनी धाराशिव जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला परंतु त्यांना कोकणातील हिरवाई व धाराशिव जिल्ह्यात असलेला ओसाड माळरान यामधील अंतर डोळ्यात सतावू लागले आणि मग काय साक्षात जिल्हाधिकाऱ्यांनी दिवस व रात्र एक करून एकाच दिवसात लाखो वृक्ष लागवडीचा संकल्प केला....
फक्त संकल्प करून शांत बसतील ते जिल्हाधिकारी कसले मग त्यांनी यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रशासनाला कामाला लावले...
जसा कोकण झाडाझुडपांनी नटलेला डोंगर रस्त्याच्या कडेला सळसळणारी हिरवळ आणि निसर्गाचा समृद्ध वारसा आहे अगदी तसाच धाराशिव जिल्हा ही हरित स्वच्छ आणि निसर्ग संपन्न बनविण्यासाठी त्यांनी वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आणि या मोहिमेची एवढी जोरात तयारी झाली की त्या मोहिमेसाठी व होणाऱ्या कार्यक्रमाची दखल घेण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांची सुद्धा टीम धाराशिव जिल्ह्यात वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाच्या दिवशी हजर राहून एकाच दिवसात लाखो वृक्ष लागवड कशी केली जाते याची नोंद घेण्यासाठी दाखल होणार असून या वृक्ष लागवडीसाठी प्रथमच जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्ह्यातील वन विभाग सोडून इतर सर्व विभागांना वृक्ष लागवड व संवर्धन करणे हे बंधनकारक करण्यात आले असून आज पर्यंत वृक्ष लागवड हा कार्यक्रम फक्त वन विभाग करत होते परंतु प्रथमच जिल्ह्याच्या इतिहासात जिल्हाधिकारी साहेब एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीची महत्त्वकांक्षा उराशी बाळगून आहेत व ती सत्यात उतरवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असून आज त्यांनी धाराशिव पासून अगदी जवळच असलेल्या शिंगोली येथील फॉरेस्ट ला भेट देऊन प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन वृक्ष लागवडीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या तसेच वृक्ष लागवड ही यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच विभागाने प्रयत्न करण्यासाठी योग्य त्या सूचनाही दिल्या....
जिल्ह्याच्या आज पर्यंतच्या वृक्ष लागवडीच्या इतिहासातही पहिल्यांदाच नोंद घ्यावी अशी घटना घडणार आहे ती म्हणजे वन विभाग सोडून इतरही विभाग वृक्ष लागवडीसाठी यावेळी जिल्हाधिकारी यांच्या विनंतीला मान देऊन सरसावले आहेत वृक्ष लागवड करण्यासाठी कृषी विभाग शिक्षण विभाग बांधकाम विभाग तसेच महसूल प्रशासनातील व सामान्य प्रशासनातील सर्वच विभागांना योग्य त्या जिम्मेदारी दिल्या असून त्या पार पाडण्यासाठी ही जिल्हाधिकारी साहेब मार्गदर्शन करत आहेत
0 टिप्पण्या