वर्ग मित्राच्या मदतीला धावून आला एक वर्गमित्र....
प्रतिनिधी...मनोज जाधव
त्याचे झाले असे की मौजे मेडशिंगा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवस्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर साळुंखे यांच्या वर्गमित्राचे दुःखद निधन झाले त्यानंतर त्यांच्या पश्चात असलेल्या मुलांना शिक्षणाचा खर्च हा खूप मोठा असल्याने आपल्या वर्ग मित्राच्या निधनानंतर त्याच्या मुलाचे शिक्षण अर्ध्यावर राहू नये म्हणून किशोर साळुंखे यांनी आज मित्राच्या घरी जाऊन त्याच्या दोन्ही मुलांना शालेय साहित्य व शिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची सोय केली यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष काकासाहेब शेलार हे होते....
समाजात गेला चांगला संदेश...
यामुळे त्या कुटुंबाला आधार तर मिळालाच परंतु किशोर साळुंखे यांनी केलेल्या कार्यामुळे समाजात एक चांगला संदेश गेला असून त्यांच्या या कार्यापासून प्रेरणा घेऊन शिक्षणापासून वंचित असलेल्या सर्व मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम ज्याला जमेल तसे करावे असेही किशोर साळुंखे यांनी यावेळी बोलताना सांगितले.....
0 टिप्पण्या