प्रतिनिधी.....मनोज जाधव
धाराशिव येथे शिवसेना उबाठा गटाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर–सोलापूर महामार्गावर सरकारविरोधात तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आले. निवडणुकीच्या काळात महायुती सरकारने दिलेली आश्वासने पूर्णपणे विसरली गेल्याचा आरोप करत सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले.
आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी “क्या हुआ तेरा वाद?” अशा घोषणा देत भाजप सरकारच्या वचनभंगावर संताप व्यक्त केला. सरकारने निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी, सन्मान योजनेतून पंधरा हजार रुपये, वृद्ध नागरिकांना दरमहा टेन्शन भत्ता, महिलांसाठी वाढीव आर्थिक मदत तसेच पंचवीस हजार गावांमध्ये रस्ते बांधण्याचे आश्वासन दिले होते. मात्र निवडणुका पार पडल्यानंतर हे सर्व आश्वासने केवळ कागदावरच राहिली असून प्रत्यक्षात काहीच अंमलबजावणी झालेली नाही, अशी संतप्त भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली.
या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती. अनेक वाहनधारकांना खोळंब्याला सामोरे जावे लागले.
या आंदोलनात शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सरकारच्या निष्क्रियतेविरोधात आणि जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले. हे आंदोलन सरकारला दिलेली शेवटची इशारा असल्याचाही इशारा यावेळी देण्यात आला.
0 टिप्पण्या