नितीन इंगळे व आकाश मुंगळे यांच्या हाय व्होल्टेज च्या पुढे महावितरणाने टाकली नांगी.....
प्रतिनिधी....मनोज जाधव
त्याचे झाले असे की धाराशिव तालुक्यातील मौजे बेंबळी येथील तडफदार व कर्तव्यदक्ष उपसरपंच श्री नितीन इंगळे व बेंबळीचे सामाजिक कार्यकर्ते आकाश मुंगळे यांच्या एक गोष्ट लक्षात आली की मागील चार दिवसापासून गावात विद्युत पुरवठा नेहमीच खंडित होत आहे मग काय हे दोन्ही वाघ थेट जिल्ह्याच्या महावितरणाच्या ऑफिसमध्ये दणक्यात घुसले....
जणू या दोन वाघाने बेंबळीला अंधार मुक्त करण्याचा विडाच उचलला आणि मग काय पुढे त्या कार्यालयामध्ये नुसता दोन तास गोंधळच उडाला सदरील अधिकाऱ्यांना या वाघांना आडवीने अशक्य झाल्याने अधिकाऱ्यांची मात्र पुरती भंबेरी उडाल्याचे व विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर झोपेत असलेला माणूस उखाड्याने जसा जागा होतो व त्रस्त होतो त्याच पद्धतीने सर्व अधिकारी हैराण झाले....
नितीन व आकाश या दोन वाघांच्या पुढे अधिकाऱ्यांनी नांगी टाकत मागील एक वर्षापासून नाशिक येथील अशोका कंपनीला काम करण्यासाठी परवानगी दिली होती त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत सदरील कामाला प्राधान्यक्रम देत काम तात्काळ करण्यासाठी लेखी पत्रच काढले त्यांच्या या पत्राची व नितीन व आकाश यांच्या आंदोलनाची दखल घेत नाशिकच्या अशोका कंपनीने सुद्धा त्यांना लेखी पत्र देऊन तात्काळ काम सुरू करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे कळवत त्यांच्यासमोर नांगी टाकली...
0 टिप्पण्या