Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

लोकप्रतिनिधींच्या कॉल रेकॉर्डिंग ची तपासणी करून टक्केवारीचा पर्दाफाश करावा...गणेश वाघमारे


लोकप्रतिनिधींच्या कॉल रेकॉर्डिंग ची तपासणी करून टक्केवारीचा पर्दाफाश करावा

प्रतिनिधी...शहाजी आगळे...

धाराशिव जिल्ह्यातील विकास कामांच्या बाबतीत जबाबदार कोण..? टक्के वारी बाबत सर्वच लोकप्रतिनिधी व मंत्री यांचे काॅल रेकाॅर्ड तपासणी बाबत जिल्हाधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांचे निवेदन.
धाराशिव :- धाराशिव जिल्ह्यातील विकास कामांच्या बाबतीत जबाबदार कोण..? टक्के वारी बाबत सर्वच लोकप्रतिनिधी व मंत्री यांचे काॅल रेकाॅर्ड तपासणी बाबत सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले,त्यात म्हण्टले आहे की,धाराशिव जिल्ह्यातील विकास कामे वर्षानुवर्षे रेंगाळतात,कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होतो परंतु तो जातो कुठे..? त्यातुनही काम मिळते कोणाला कसे मनमानी या टक्के वारी घेऊन..?
याला जबाबदार कोण..? याचे वास्तव दैनिक मिडीयातुन वाचले जाते,आरोप प्रत्यारोप दलाली असतांना यांच्या मुळे काम होत नाही तर लोकप्रतिनिधी व मंत्री आपापल्या मर्जीतील कार्यकर्ते, कंत्राटदार यांच्या कडुन १०-१२% टक्के वारी घेऊन काम त्यांना दिले जाते हि बाब अतिशय गंभीर असुन  एकीकडे भारतीय संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे केले जात असतांना ही बाब चिंताजनक व लोकशाहीला मारक आहे असे मी समजतो.मध्यंतरी एका आमदाराचा खाजगी सचिव म्हणुन वादळ उठते तर पालकमंत्री यांचे बनावट पिए अशीही बातमी व चर्चा ऐकायला मिळते,यातुन धाराशिव कर मात्र मुलभूत सुविधा पासुन दुर आहेत.धाराशिवच्या विकासाला आडवे येणारे आणि टक्के वारीवर प्रश्न निर्माण होणे याला कोण जबाबदार आहे यासाठी ज्यांनी कंत्राटदार किंवा कार्यकर्त्यांकडुन १०-१२% रक्कम घेतली आहे यासाठी सर्वंच लोकप्रतिनिधी व मंत्री यांचे काॅल रेकाॅर्ड तपासणी करणे गरजेचे आहे म्हणजे सत्यता बाहेर येऊन आम्हा सामान्य जनतेला कळेल.यासह संबंधित अधिकारी व मध्यस्थी दलालांची देखील माहिती समोर येईल.सदर टक्के वारी प्रकरणात लोकप्रतिनिधी व मंत्री यांचा सहभाग आहे की नाही हे निष्पन्न करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी व मंत्री यांचे काॅल रेकाॅर्ड (मोबाईल काॅल) तपासणी करुन धाराशिव करांना न्याय द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे‍ यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्याशी चर्चा करुन निवेदनतुन करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या