काक्रंबा उड्डाणपुलासाठी लागणाऱ्या मुरमात कोणाचे हात ओले......
अवैध मुरुम उत्खनन प्रशासनाची कासवगती कंत्राटदाराला धार्जिण
धाराशिव - तुळजापूर लातूर महामार्गावरील असणाऱ्या काक्रंबा येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी लागणार मुरुम अवैधरित्या उत्खनन करून आणला असून याबाबत प्रशासनची कासवगती कंत्राटदाराला धार्जिण ठरत असून अद्याप ठोस कारवाई न झाल्याने कंत्राटदार उत्खनन केलेला मुरुम कामासाठी वापरून असे काही घडलेच नाही असा आव आणण्याच्या तयारीत आहे...
महसूल प्रशासनातील नेमका आका कोण ?
राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला किती मुरुम लागतो याचे गणित जिल्हा प्रशासनाला माहिती असताना देखील अवैध उत्खनन करण्याकडे कानाडोळा करण्यात कोणाचा हात आहे याचा शोध घ्यावा लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्याच्या ठिकाणी याच्या परवानग्या असून बड्या अधिकाऱ्यांना सलाम करून हे उत्खनन सुरू असून आतापर्यंत केलेले उत्खनन, कामाच्या ठिकाणी वापरला गेलेला मुरुम याची साधी मोजदाद देखील प्रशासनाने केली नसल्याने हे ' मुरुमायण ' कोणाच्या दिग्दर्शनाखाली सुरू आहे, याचे निर्माते कोण आहेत हे आता पाहावे लागणार आहे...
0 टिप्पण्या