धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी चुरस वाढली – कोळगे यांच्यासह अनेक नावे चर्चेत
पक्षनिष्ठ कार्यकर्ता हीच त्यांची खरी ओळख
धाराशिव – भारतीय जनता पार्टीच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष पदासाठी चुरस शिगेला पोहोचली असून, विविध नेत्यांची नावे समोर येत आहेत. पक्षात दीर्घकाळ सेवा केलेले आणि कार्यकर्त्यांमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेले रामदास सुभाषराव कोळगे हे या पदासाठी आघाडीच्या दावेदारांपैकी एक मानले जात आहेत.
रामदास कोळगे हे 1989 पासून भाजपमध्ये सक्रीय असून, त्यांनी युवा मोर्चा, किसान मोर्चा, बजरंग दल, विहिप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनांतून कार्य केले आहे. भूम-वाशी तालुक्यात त्यांनी संघ प्रचारक म्हणून एक वर्ष सेवा दिली आहे. 1993 च्या भूकंपात मदतकार्य, अटल पणन समिती व बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्यावर तज्ज्ञ संचालक म्हणून योगदान, तसेच सलग तीन वेळा पंचायत समिती सदस्य व उपसभापती म्हणून कार्यकाल – अशा विविध अंगाने त्यांनी आपली राजकीय वाटचाल सिद्ध केलेली आहे.
सध्या समर्थ अर्बन को-ऑपरेटिव बँकेचे संचालक म्हणून कार्यरत असलेले कोळगे यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडावी, अशी कार्यकर्त्यांमध्ये मागणी असून, ते नेहमी पक्षाची ध्वजवाहक भूमिका पार पाडत आले आहेत.
जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संभाव्य यादी पुढीलप्रमाणे :
रामदास कोळगे, प्रदेश सचिव भाजप किसान मोर्चा, माजी जि.प. सदस्य
अनिल काळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य
दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष
संताजी चालुक्य, विद्यमान जिल्हाध्यक्ष
नेताजी पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष
विनोद कपाट, प्रदेश कार्यकारणी सदस्य
व्यंकटराव गुंड, प्रदेश कार्यकारणी सदस्य
संतोष बोबडे, माजी तालुकाध्यक्ष
विजय शिंगाडे, माजी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष
गेल्या वेळेस जिल्हाध्यक्ष पद अंतिम क्षणी संताजी काका चालुक्य यांच्याकडे गेले होते, यंदा मात्र रामदास कोळगे यांच्याही नावाची प्रबळ चर्चा आहे. मात्र या यादीतील कोणीही जिल्हाध्यक्षपदासाठी योग्य ठरू शकतो. त्यामुळे या नेत्यांपैकी किंवा इतर कोणाच्या गळ्यात भाजप जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 टिप्पण्या