Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल घरबुडवे यांचे रक्तदान..

 बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल घरबुडवे यांचे रक्तदान..

प्रतिनिधी .....शहाजी आगळे 

धाराशिव :- बहुजनांचे ह्रदयसम्राट, स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे वंचित बहुजन आघाडी व आंबेडकर प्रेमी यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीचे सदस्य विशाल घरबुडवे यांनी रक्तदान केले,यावेळी इतरही कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त इतरही सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.देशातील युध्दगत परिस्थिती असतांना इतर कार्यक्रम न घेता देशहिताचे कार्यक्रम राबवुन वाढदिवस साजरा करण्याच्या सुचना एॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी दिल्या होत्या.रक्तदान शिबिरात रक्तपिढीचे अधिकारी कर्मचारी व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या