जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने विविध उपक्रमांनी साजरी..
धाराशिव :- फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांची २५६९ वी जयंती अर्थात बुध्द पौर्णिमा मोठ्या उत्साहाने विविध सामाजिक उपक्रम घेऊन साजरी करण्यात आली.जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांचे विचार जगाला प्रेरणादायी ठरतात, सध्याच्या युध्द गत परिस्थिती निर्माण झाली असतांना जगाला युध्दाची नव्हे तर बुध्दाची गरज आहे.प्रथमता विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस पुष्प अर्पण करण्यात आले, सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली.महामानवाच्या जयंती महोत्सवातील आकर्षक अशा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली,या देखाव्याचा समारोप आज रोजी बुध्द पौर्णिमा निमित्त केला जात असुन बुध्द पौर्णिमा निमित्त सकाळी सात वाजल्यापासूनच महामानव व तथागतास अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी सुरुवात केली होती,या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ व भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान उद्देशिका विश्लेषण पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले,तर शासकीय महिला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षका डॉ. स्मिताताई गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना समितीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी डॉ स्मिताताई गवळी,रक्तदाते इंजि.सुभाष नगडे,पोलीस आकाश ओव्हाळ पुणे,प्रा.गुरुनाथ गायकवाड मुंबई,सामाजिक कार्यकर्ते कानिफनाथ देवकुळे,संत गाडगेबाबा जयंती मंडळाचे जिल्हाध्यक्ष नेताजी धोंगडे यांच्या सह इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्ष राजश्री कदम,सविता लगाडे,जयश्री चव्हाण, विजयमाला धावारे,बौध्दाचार्य गुणवंत सोनवणे,समितीचे गणेश वाघमारे,सिध्दार्थ बनसोडे,प्रवीण जगताप,संजय गजधने,अंकुश उबाळे, धनंजय वाघमारे,बलभीम कांबळे,संपतराव शिंदे, बाबासाहेब गुळीग,दगडु आप्पा बनसोडे,स्वराज जानराव,अतुल लष्करे,अमोल वाघमारे,राजेंद्र धावारे,मेसा जानराव,मुकेश मोटे,रवि सुरवसे,एॅड.साबळे, सिद्राम वाघमारे,राजाराम बनसोडे,सरवदे, सचिन दिलपाक,तुकाराम बनसोडे,शेखर गायकवाड,शाहु बनसोडे,बाबा कांबळे, सचिन बनसोडे सह इतर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बलभीम कांबळे यांनी केले तर आभार गणेश वाघमारे यांनी मानले.
0 टिप्पण्या